शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन साहित्य

राष्ट्राला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल, एक अद्वितीय नाममुद्रा निर्माण करायची असेल तर आपल्याला सांप्रत आव्हानांवर आणि भविष्यातील संधींवर लक्ष केंद्रित करत असताना, आपल्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाशी असलेलीनाळ जपणे महत्त्वाचे आहे.भारत देश, आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी आणि वैविध्यपूर्णतेसाठीओळखला आणि वाखाणलाजातो.

हा भारत अनुभवण्यासाठी साहित्यिक आणि कलात्मक अभिव्यक्तींचा आस्वाद घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. उद्याचे नेतृत्व करणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या पिढीला या समृद्ध संस्कृती आणि वारशाबद्दल अवगत केले तरच ते भारताचा महान वारसा पुढे नेऊ शकतील.

युवा पिढीनेदेशी भाषांतील साहित्याचे क्रांतिकारकत्व जाणून घेणे आणि आधुनिक संदर्भात त्याची मांडणी करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

 डॉ. नीतीन रिंढे
डॉ. नीतीन रिंढेमुख्य समन्वयक
महाराष्ट्र आज ज्या क्षेत्रांत अव्वल आहे,त्यांपैकी एक क्षेत्र म्हणजे साहित्य. मराठी साहित्याची साडेसातशे वर्षांची सशक्त परंपरा केवळ मराठी समाजालाच नव्हे, तर भारतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाचकांनाही जीवनरस पुरवत आहे. परिवर्तनवादी, आधुनिक मूल्यांवर विकास पावलेल्या महाराष्ट्रीय संस्कृतीच्या जडणघडणीत मराठी साहित्याचा मोठा वाटा आहे. प्रत्येक काळात होणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरांचे आव्हान पेलून त्यांना हवी ती दिशा देण्याची ताकद मराठी साहित्याने वेळोवेळी दाखवली आहे.
मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक गांभीर्यानेप्रयत्न आणि रचनात्मक प्रयोग करणे अत्यावश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या, अत्यंत स्पर्धात्मक वातावरण आणि विविध माध्यमांचा स्फोट या सर्वाच्या प्रभावामुळे तरुण पिढी मराठी साहित्यापासून आणि वाचन-लेखन-संशोधन संस्कृतीपासून दूर जात आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषा मराठीच्या सर्वंकष उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत काही नवोदित लेखक नवनवे विषय हाताळत असतात खरे;पण अशा लेखकांचे प्रमाण तितकेसे समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळेच तरुण पिढीत नवे लेखक निर्माण व्हावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील उपजत लेखनप्रतिभा बहरावी यासाठी निश्चित कृतिकार्यक्रम देणे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटरने 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' सुरू केली आहे. 'ध्यास सर्वोत्तमचा, शोध युवा लेखकांचा' (परिपूर्णतेचे लक्ष्य, तरुण लेखकांच्या शोधात) हे या साहित्य फेलोशिप चे ब्रीदवाक्य आहे.
  • प्रतिभावान तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना साहित्य फेलोशिप द्वारे सर्जनशील लेखनासाठी व्यासपीठ प्रदान करणे.
  • लेखकांना पाठ्यवृत्तीच्या काळात नियोजनबद्ध मार्गदर्शन करणे व त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देणे.
  • तज्ज्ञ समितीने मंजूर केलेले लेखकांचे लेखन पुस्तकरूपात प्रकाशित करण्यास संबंधित लेखकांना प्रोत्साहित करणे आणि मदत करणे.
ऑफर :
  1. पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकांना अनुदान. यात प्रवास/निवासी भत्ता आणि पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आंशिक आर्थिक साहाय्य याचाही समावेश असेल.
  2. लेखन प्रक्रियेतील समस्या दूर करून लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठी,आवश्यक त्या संशोधनासाठी पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकाला स्वतंत्र मार्गदर्शक.
  3. लेखनासंदर्भातले मार्गदर्शन वर्ग आणि मराठीतील यशस्वी समकालीन लेखकांशी खुल्या चर्चांची संवादसत्रे.
  1. दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका प्रकारात स्वतंत्र पुस्तक लिहिण्यास किंवा पुस्तक भाषांतरित करण्यास इच्छुक कोणीही मराठी भाषक तरुण लेखक-लेखिका अर्ज करू शकतात.
  2. वयोमर्यादा : 25 ऑगस्ट 2023 रोजी वयाची 35 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा कमी.
  • शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती ही संशोधन प्रकल्पासाठी नसून साहित्य लेखनासाठी आहे. हे लक्षात घेऊन, ललितेतर साहित्य (nonfiction) या प्रकारातील लेखनासाठीचे विषय निश्चित करावेत.
  • इतरत्र पदवीसाठी वा अन्य कारणासाठी सादर केलेले साहित्य या पाठ्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाही. पाठ्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर तसे आढळल्यास त्या लेखकाला दिलेली पाठ्यवृत्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पाठ्यवृत्तीधारक लेखकाने निवडलेल्या विषयावर स्वतंत्रपणे नव्याने लेखन करणे आवश्यक आहे.

  • शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप साठी इच्छुक लेखक खालीलपैकी कोणताही एक साहित्य प्रकार निवडू शकतात.
    1. कादंबरी किंवा दीर्घकथा.
    2. नाटक.
    3. ललितेतर साहित्य (चरित्र, सामाजिक शास्त्रांशी संबंधित किंवा लोकसाहित्याशी संबंधित इत्यादी).
    4. कोणत्याही भारतीय किंवा विदेशी भाषेतून मराठीत अनुवाद (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
    5. विज्ञान साहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
    6. बालसाहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य)

  • पाठ्यवृत्तीचे स्वरूप :
    1. निवड झालेल्या लेखकाला लेखनासाठी पाठ्यवृत्ती रु.५०,०००/-
    2. पाठ्यवृत्तीच्या कालावधीत इतर खर्चासाठी सहाय्य रु. ५०,०००/-
      • पाठ्यवृत्तीच्या कालावधीत होणाऱ्या अभिमुखता कार्यक्रम, संवाद-सत्रे यांसाठी प्रवास आणि निवास खर्च
      • लेखकासाठी नेमलेल्या मार्गदर्शकांचे मानधन व प्रवासखर्च
      • निवड समितीच्या मान्यतेनंतर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अर्थसाहाय्य
विहित मुदतीत आलेल्या अर्जांचे आणि नमुना मजकुराचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून, आवश्यक वाटल्यास अर्जदार लेखकांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि अंतिमतः
एकूण १२ युवा लेखक-लेखिकांची निवड तटस्थपणे करण्यात येईल. स्त्री उमेदवारांना समान संधी दिली जाईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हेच निकष कटाक्षाने असतील.

२५ ऑगस्ट, २०२३

कार्यशाळेचे वेळापत्रक जाहीर

२५ ऑगस्ट, २०२३

२५ ऑगस्ट, २०२३ ते ३० ऑक्टोबर, २०२३

ऑनलाइन फॉर्म सबमिशन

३० ऑक्टोबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३

छाननी आणि निकालाची तयारी

३० ऑक्टोबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३

२६नोव्हेंबर २०२३

निकालाची घोषणा

१० डिसेंबर 2023

फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रम

१० डिसेंबर 2023

पाठ्यवृत्तीचा कालावधी - १२ डिसेंबर, २०२३ ते १२ डिसेंबर, २०२४

१० मार्च, २०२४ ते १२ मार्च, २०२४

पहिली कार्यशाळा

१० मार्च, २०२४ ते १२ मार्च, २०२४

१0 जुलै, २०२४ ते १२ जुलै, २०२४

दुसरी कार्यशाळा

१० नोव्हेंबर २०२३

अंतिम सादरीकरण

१० नोव्हेंबर २०२३

    पाठ्यवृत्ती प्राप्त दहा लेखक-लेखिकांनी पूर्ण केलेल्या लेखनाची अंतिम प्रत 20 नोव्हेंबर 2023 रोजी निवड समितीकडे सादर करायची आहे. त्याचे मूल्यमापन केल्यानंतर 21 डिसेंबर 2023 रोजी या लेखनाचा अहवाल सादर केला जाईल. त्याचप्रमाणे, पुढील वर्षीच्या पाठ्यवृत्तीसाठी निवडलेल्या दहा लेखक-लेखिकांची नावे देखील जाहीर केली जातील.

    पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा कालावधी २५ ऑगस्ट, २०२३ ते ३० ऑक्टोबर, २०२३ असा आहे. ३० ऑक्टोबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या काळात अर्जांची छाननी केली जाईल.

    २६नोव्हेंबर २०२३ रोजी पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकांची नावे जाहीर केली जातील. २६नोव्हेंबर २०२३ रोजी समारंभपूर्वक पाठ्यवृत्ती प्रदान केली जाईल.

    इच्छुक लेखकांनी त्यांच्या नियोजित लेखनाविषयीची सारांश रूपाने कल्पना आणि नमुना लेखन पीडीएफ स्वरूपात अर्जासोबत पुढीलप्रमाणे जोडायचे आहे : लेखनविषयाची सारांश रूपाने कल्पना सुमारे ५०० शब्दांत आणि त्याचे नमुना लेखनाचे एक प्रकरण (सुमारे २००० शब्दांत). पाठ्यवृत्ती ‘भाषांतर’ या प्रकारासाठी हवी असल्यास,‘लेखनविषयाची सारांशरूपाने कल्पना’ या सदराखाली मूळ पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, आवृत्तीचे प्रकाशन वर्ष इत्यादी तपशिलासह पुस्तकातील आशयाचा सारांश पीडीएफ स्वरूपात सुमारे ५०० शब्दांत द्यावा. त्या पुस्तकातील एका प्रकरणाचे मराठी भाषांतर (सुमारे २००० शब्द)पीडीएफ स्वरूपात जोडावे.

    पाठ्यावृत्तीचा कालावधी १२ डिसेंबर, २०२३ ते १२ डिसेंबर, २०२४

    पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या लेखकांसाठी पहिला अभिमुखता कार्यक्रम 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2023 ला घेतला जाईल.

    पाठ्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या लेखकांनी www.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावरीवल अर्ज योग्य रीतीने भरावा. आवश्यक तो तपशील उदाहरणार्थ, नाव, पत्ता, संपर्क, शाळा, महाविद्यालय, नोकरी-व्यवसाय यांचा उल्लेख करावा.आपल्याला प्रभावित केलेल्या तीन लेखकांबद्दल ३०० ते ५०० शब्दांचा मजकूर लिहावा. शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती मिळविण्यामागचे आपले उद्दिष्ट काय आहे, ते २०० शब्दांत लिहावे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

‘शरदचंद्र पवार साहित्य शिष्यवृती’

ध्यास सर्वोत्तमाचा, शोध युवालेखकांचा

राष्ट्राला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल, एक अद्वितीय नाममुद्रा निर्माण करायची असेल तर आपल्याला सांप्रत आव्हानांवर आणि भविष्यातील संधींवर लक्ष केंद्रित करत असताना, आपल्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाशी असलेलीनाळ जपणे महत्त्वाचे आहे.भारत देश, आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी आणि वैविध्यपूर्णतेसाठीओळखला आणि वाखाणलाजातो.

हा भारत अनुभवण्यासाठी साहित्यिक आणि कलात्मक अभिव्यक्तींचा आस्वाद घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. उद्याचे नेतृत्व करणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या पिढीला या समृद्ध संस्कृती आणि वारशाबद्दल अवगत केले तरच ते भारताचा महान वारसा पुढे नेऊ शकतील.

युवा पिढीनेदेशी भाषांतील साहित्याचे क्रांतिकारकत्व जाणून घेणे आणि आधुनिक संदर्भात त्याची मांडणी करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

भूमिका :

मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक गांभीर्यानेप्रयत्न आणि रचनात्मक प्रयोग करणे अत्यावश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या, अत्यंत स्पर्धात्मक वातावरण आणि विविध माध्यमांचा स्फोट या सर्वाच्या प्रभावामुळे तरुण पिढी मराठी साहित्यापासून आणि वाचन-लेखन-संशोधन संस्कृतीपासून दूर जात आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषा मराठीच्या सर्वंकष उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत काही नवोदित लेखक नवनवे विषय हाताळत असतात खरे;पण अशा लेखकांचे प्रमाण तितकेसे समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळेच तरुण पिढीत नवे लेखक निर्माण व्हावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील उपजत लेखनप्रतिभा बहरावी यासाठी निश्चित कृतिकार्यक्रम देणे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटरने 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' सुरू केली आहे. 'ध्यास सर्वोत्तमचा, शोध युवा लेखकांचा' (परिपूर्णतेचे लक्ष्य, तरुण लेखकांच्या शोधात) हे या साहित्य फेलोशिप चे ब्रीदवाक्य आहे.

उद्दिष्टे :

  • प्रतिभावान तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना साहित्य फेलोशिप द्वारे सर्जनशील लेखनासाठी व्यासपीठ प्रदान करणे.
  • लेखकांना पाठ्यवृत्तीच्या काळात नियोजनबद्ध मार्गदर्शन करणे व त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देणे.
  • तज्ज्ञ समितीने मंजूर केलेले लेखकांचे लेखन पुस्तकरूपात प्रकाशित करण्यास संबंधित लेखकांना प्रोत्साहित करणे आणि मदत करणे.

ऑफर :

  1. पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकांना अनुदान. यात प्रवास/निवासी भत्ता आणि पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आंशिक आर्थिक साहाय्य याचाही समावेश असेल.
  2. लेखन प्रक्रियेतील समस्या दूर करून लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठी,आवश्यक त्या संशोधनासाठी पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकाला स्वतंत्र मार्गदर्शक.
  3. लेखनासंदर्भातले मार्गदर्शन वर्ग आणि मराठीतील यशस्वी समकालीन लेखकांशी खुल्या चर्चांची संवादसत्रे.
पात्रता :

  • दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका प्रकारात स्वतंत्र पुस्तक लिहिण्यास किंवा पुस्तक भाषांतरित करण्यास इच्छुक कोणीही मराठी भाषक तरुण लेखक-लेखिका अर्ज करू शकतात.
  • वयोमर्यादा : 25 ऑगस्ट 2023 रोजी वयाची 35 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा कमी.

  • शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती ही संशोधन प्रकल्पासाठी नसून साहित्य लेखनासाठी आहे. हे लक्षात घेऊन, ललितेतर साहित्य (nonfiction) या प्रकारातील लेखनासाठीचे विषय निश्चित करावेत.
  • इतरत्र पदवीसाठी वा अन्य कारणासाठी सादर केलेले साहित्य या पाठ्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाही. पाठ्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर तसे आढळल्यास त्या लेखकाला दिलेली पाठ्यवृत्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पाठ्यवृत्तीधारक लेखकाने निवडलेल्या विषयावर स्वतंत्रपणे नव्याने लेखन करणे आवश्यक आहे.

शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप साठी इच्छुक लेखक खालीलपैकी कोणताही एक साहित्य प्रकार निवडू शकतात.

    1. कादंबरी किंवा दीर्घकथा.
    2. नाटक.
    3. ललितेतर साहित्य (चरित्र, सामाजिक शास्त्रांशी संबंधित किंवा लोकसाहित्याशी संबंधित इत्यादी).
    4. कोणत्याही भारतीय किंवा विदेशी भाषेतून मराठीत अनुवाद (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
    5. विज्ञान साहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
    6. बालसाहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य)

  • पाठ्यवृत्तीचे स्वरूप :

    1. निवड झालेल्या लेखकाला लेखनासाठी पाठ्यवृत्ती रु.५०,०००/-
    2. पाठ्यवृत्तीच्या कालावधीत इतर खर्चासाठी सहाय्य रु. ५०,०००/-
      • पाठ्यवृत्तीच्या कालावधीत होणाऱ्या अभिमुखता कार्यक्रम, संवाद-सत्रे यांसाठी प्रवास आणि निवास खर्च
      • लेखकासाठी नेमलेल्या मार्गदर्शकांचे मानधन व प्रवासखर्च
      • निवड समितीच्या मान्यतेनंतर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अर्थसाहाय्य

फेलोशिप निवड प्रक्रिया आणि स्वरूप

अ) अर्ज करण्याची पद्धत :

फेलोशिपसाठी इच्छुक युवक-युवतींनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईने विहीत केलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपली अचूक माहिती भरावी. इच्छुकांनी तपशीलवार परिचय - नाव, पत्ता, संपर्क, शाळा, महाविद्यालय, नोकरी- व्यवसाय. आवडतेलेखक/आयुष्यावर प्रभाव टाकणारी किमान तीन पुस्तके अथवा लेखक याविषयी किमान 200 शब्दांत माहिती द्यावी. त्यात आणखी एक प्रश्न असेल ज्याचे सविस्तर उत्तर अपेक्षित असेल. प्रश्न : ‘शरदचंद्र पवार साहित्य शिष्यवृत्ती : ध्यास सर्वोत्तमाचा, शोध युवालेखकांचा’ या फेलोशिपमुळे तुम्ही सध्या लेखन करत असलेल्या कार्यात किंवा नियोजित लेखनकार्यात कशा प्रकारे साहाय्य होईल असे वाटते याचे सविस्तर उत्तर लिहा.

  • आपल्या नियोजित लेखनाचा मजकूर पीडीएफ स्वरूपात सोबत जोडावा. खालीलप्रकारे आपण मजकूर जोडू शकता :
  • * कादंबरी असल्यास किमान 2000 शब्दांचे एक प्रकरण; दीर्घ कथा असल्यास किमान एक प्रकरण. तसेच, कादंबरी अथवा दीर्घ कथेचा 500 शब्दांत आराखडा/प्रारूप जोडावे.
  • * नाटक असल्यास किमान 2000 शब्दांचा मजकूर आणि सोबत नाटकाचा विषय सुस्पष्ट होईल अशा प्रकारचा 500 शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
  • * ललितेतर साहित्य (नॉन फिक्शन) असल्यास किमान 2000 शब्दांचा मजकूर आणि विषय-आशय-तपशील स्पष्ट होईल अशा प्रकारचा 500 शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
  • * अनुवादित साहित्य असल्यास, मूळ भाषेतील एक प्रकरण आणि त्याचा मराठीत केलेल्या अनुवादाचा मजकूर असे दोन्ही भाग जोडावेत. अनुवादित मजकूर हा किमान 2000 शब्दांचा असावा. सोबत, मूळ पुस्तकाचे शीर्षक, लेखक, प्रकाशक, विषय-आशय यांची स्पष्ट माहिती देणारा आराखडा/प्रारूप किमान 500 शब्दांत जोडावे.
  • * विज्ञान साहित्य असल्यास, किमान 2000 शब्दांचा मजकूर आणि विषय- आशय-तपशील स्पष्ट होईल अशा प्रकारचा किमान 500 शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.

ब) फेलोशिप कालावधी :

  • फेलोशिपचा कालावधी हा 12 डिसेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2024 असा एका वर्षाचा असेल.
  • ऑनलाइन फॉर्म सबमिशन कालावधी : 25 ऑगस्ट, 2023 ते 30 ऑक्टोबर, 2023
  • निवड प्रक्रिया कालावधी : 30 ऑक्टोबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत निवड प्रक्रिया पूर्णहोईल. १० डिसेंबर 2023 रोजी फेलोशिप प्रदान करण्यात येईल.
  • अभिमुखता कार्यक्रम :निवड झालेल्या उमेदवारांचा अभिमुखता कार्यक्रम (ओरिएंटेशन प्रोग्रॅम) दिनांक 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत पार पडेल.
  • लेखनप्रगती मंथनबैठक पहिली : निवड झालेल्या उमेदवारांच्या लेखनकार्याच्या प्रगतीचा आढावा घेणारी पहिली बैठक 10 मार्च, 2024 ते 12 मार्च, 2024 या कालावधीत असेल.
  • लेखनप्रगती मंथनबैठक दुसरी : उमेदवारांच्या लेखनकार्याच्या प्रगतीचा आढावा घेणारी दुसरी बैठक 10 जुलै, 2024 ते 12 जुलै, 2024 या कालावधीत असेल. अंतिम सुपुर्दता (सबमिशन) : बारा उमेदवारांनी वर्षभर केलेले लेखन १० नोव्हेंबर, २०२४ रोजी ते संस्थेकडे सुपुर्द करतील. त्याचे परीक्षण करून, दिनांक १२ डिसेंबर, २०२४ रोजी वर्षभरातील दहा उमेदवारांच्या लेखनाविषयीची माहिती सर्वांसमोर मांडण्यात येईल. तसेच, पुढील वर्षाच्या फेलोशिपसाठी (सन २०२३ ते २०२४) अंतिम निवड झालेल्या दहा उमेदवारांच्या नावाची घोषणाही या दिवशी होईल.
  • प्रकाशन योजना : फेलोशिप अंतर्गत लेखकाने तयार केलेल्या लेखनाचा अंतिम मसुदा तज्ज्ञ निवड समितीने स्वीकृत केल्यानंतर तो पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सहकार्य करेल. यात (लेखकाच्या सहमतीने) प्रकाशन संस्थेची निवड आणि प्रकाशनासाठी/अनुवादाचे हक्काचे घेण्यासाठी रुपये 25 हजार आर्थिक सहकार्य यांचा समावेश असेल.

क) फेलिशिपसाठी निवड :

आलेल्या अर्जांचे आणि मजकुरांचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून, आवश्यक वाटल्यास त्यांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि अंतिमतः  युवक   आणि  युवती अशा एकूण 12  युवक-युवतींची निवड तटस्थपणे करण्यात येईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हाच एकमेव निकष असेल.

ड) फेलोशिप स्वरूप :

निवड झालेल्या प्रत्येक लेखकाला लेखनाचे कौशल्य, तंत्र, संशोधन यांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी गरज असल्यास एक तज्ज्ञ मेंटॉर देण्यात येईल. लेखक आणि निवड समिती यांच्या परस्पर-विचाराने लेखकाला आवश्यकता असेल तर मेंटॉर देण्यात येईल. निवड झालेल्या लेखकाला फेलोशिप कालावधीत प्रत्येकी रुपये 50,000 मानधन प्रतिष्ठान विहीत करेल व ते चार टप्प्यांत देण्यात येईल. याशिवाय प्रवास, निवास यांसाठी प्रत्येक सत्रासाठी रुपये 5000 याप्रमाणे एकूण चार सत्रांसाठी 20,000 रुपये (सत्र 1 अभिमुखता; सत्र 2 लेखनप्रगती मंथनबैठक पहिली; सत्र 3 लेखनप्रगती मंथनबैठक दुसरी; सत्र 4 अंतिम सुपुर्दता) देण्यात येतील. मेंटॉरचे मानधन व प्रवास यासाठी रुपये 30,000 खर्च करण्यात येतील.

फेलोशिप निवड समिती :

फेलोशिप निवड समितीमध्येमराठी साहित्यक्षेत्रात दीर्घअनुभव असलेल्या तज्ज्ञांचा समावेश असेल. निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. निवडलेल्या उमेदवाराच्या प्रगतीचा आढावा या समितीमार्फत वेळोवेळी घेण्यात येईल. सृजनाची प्रक्रिया ही बर्‍याचदा गुंतागुंतीची असल्याने, आवश्यकेनुसार मेंटॉरचा सल्ला विचारात घेऊन विशिष्ट परिस्थितीत लेखन प्रकल्पाची मुदत वाढवणे किंवा उमेदवाराची प्रगती समाधानकारक नसल्यास मुदत पूर्ण होण्यापूर्वीच फेलोशिप रद्द करणेयाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवड समितीला असतील.

  • अभिमुखता आणि लेखन आढावा सत्रांमध्ये समकालीन युवा लेखकांशी संवाद साधण्याची संधीही निवड झालेल्या उमेदवारांना लाभणार आहे.
  • या फेलोशिप योजनेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्री. नितीन रिंढे हे मार्गदर्शक असतील. या फेलोशिप योजनेसाठी श्री. हेमंत टकले (कोषाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई) हे निमंत्रक असतील. प्रतिष्ठानचे ग्रंथपाल श्री. अनिल पाझारे, प्रतिष्ठानचे मानद कार्यक्रम संयोजक श्री. दत्ता बाळसराफ आणि अनुवादक-संपादक चेतन कोळी त्यांना सहकार्य व समन्वय करतील.

फेलोशिप निवड समितीसाठी प्रस्तावित नावे :

1) डॉ. राजन गवस (कोल्हापूर)

2) प्रा. प्रज्ञा दया पवार (ठाणे)

3) श्री. गणेश विसपुते (मुंबई)

4) श्री. विजय केंकरे (मुंबई)

5) श्री. राजीव नाईक

6) प्रा. मनोज बोरगांवकर (नांंदेड)

7) श्री. विनोद शिरसाठ (पुणे)

8) प्रा. हरी नरके

(वरील आठ व्यक्तींना या योजनेची सविस्तर माहिती पत्राद्वारे देण्यात आली असून, त्यांनी निवड समितीत आणि एकूणच या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संमती दिली आहे.)

9) श्रीमती करुणा गोखले(पुणे)

10) डॉ. विवेक बेळे (पुणे)

11) श्री. शफाअत खान (वसई)

12) श्री. अतुल देउळगावकर (लातूर)

13) डॉ. बाळ फोंडके

14) श्री. भानू काळे (पुणे)

15) श्री. रमेश इंगळे उत्रादकर

16) श्री. उमेश बगाडे

18) प्रा. हरिश्चंद्र थोरात (मुंबई)

(वरील व्यक्ती (अनुक्रम 9 ते 18) यांना पत्र पाठवण्यात आले असून, त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत.)

फेलोशिप सल्लागार समितीसाठी प्रस्तावित नावे :

1) डॉ. जयंत नारळीकर

2) प्रा. भालचंद्र नेमाडे

3) श्री. रंगनाथ पठारे

4) श्री. माधव गाडगीळ

5) श्री. महेश एलकुंचवार

6) श्री. नरेंद्र चपळगावकर

7) प्रा. चंद्रकांत पाटील

8) श्रीमती प्रभा गणोरकर

9) श्रीमती वीणा गवाणकर

10) श्री. वसंत आबाजी डहाके

11) श्री. गणेश देवी

12) श्री. नंदा खरे

13) श्री. दिनकर गांगल

14) श्री. शाम मनोहर

(वरील नमूद केलेल्या व्यक्तीना पत्र पाठवण्यात आले असून, त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत.)

समकालीन युवा लेखकांशी संवादसत्र : प्रस्तावित नावे

1) अवधूत डोंगरे

2) प्रणव सखदेव

3) शर्मिला फडके

4) शिल्पा कांबळे

5) किरण गुरव

(वरील पाच व्यक्तींना पत्र पोहोचले असून त्यांनी संवाद सत्त्रात आणि एकूणच या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संमती दर्शवली आहे.)

6) श्रीरंजन आवटे

7) प्राजक्त देशमुख

8) मनस्विनी लता रवींद्र

9) बालाजी मदन इंगळे

10) बालाजी सुतार

11) हृषिकेश गुप्ते

(वरील नमूद केलेल्या व्यक्तींना (अनुक्रम 6 ते 11) पत्र मिळाले असून त्यांच्या संमतीची प्रतीक्षा करत आहोत.)

सहकारी प्रकाशक समिती :

अंतिम निवड झालेल्या 12 लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याच्या दृष्टीने खालील प्रकाशक सहकारी प्रकाशक समितीत असतील.

1) रोहन प्रकाशन

2) ग्रंथाली प्रकाशन

3) मधुश्री पब्लिकेशन्स

4) मंजुल पब्लिशिंग हाउस

5) समकालीन प्रकाशन

6) शब्दालय प्रकाशन

7) साधना प्रकाशन

8) साकेत प्रकाशन

9) मेहता पब्लिशिंग हाउस

10) मनोविकास प्रकाशन

11) शब्द पब्लिकेशन्स

12) साहित्य प्रसार केंद्र

प्रसिद्धी आणि प्रचार :

ग्रामीण तसेच शहरी भागांतील युवा लेखकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचावी यासाठी संस्थेच्या वेबसाइट व्यतिरिक्त पुढील माध्यमांतून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे :

अ) वर्तमानपत्रे : सकाळ, पुढारी, लोकमत, लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, पुण्यनगरी, नवराष्ट्र या मुख्य वृत्तपत्रांसोबतच त्या-त्या भागांतील स्थानिक वृत्तपत्रांत या योजनेची माहिती प्रसिद्धीस देण्यात यावी.

ब) नियतकालिके/मासिके : साहित्यविषयक नियतकालिके/मासिके - मायमावशी, केल्याने भाषांतर, ललित, मुक्तशब्द, समाज प्रबोधन पत्रिका, चित्रलेखा, महानुभव, शब्दरुची, परिवर्तनाचा वाटसरू, मार्मिक, साधना, लोकप्रभा, राष्ट्रवादी मासिक, निवडक दिवाळी अंक इत्यादी.

क) वेब पोर्टल्स : विविध वेब पोर्टल्स, अक्षरनामा, थिंक महाराष्ट्र इत्यादी.

ड) सोशल मीडिया : फेसबुक आणि व्हॉट्स अपवरील साहित्यविषयक ग्रुप्स.

इ) साहित्यसंस्था : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखा, विदर्भ साहित्य संघ, बृहन्महाराष्ट्र मंडळ.

उ) वैयक्तिक स्तरावर प्रसार : मान्यवर लेखक, ब्लॉगर, संपादक यांना या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याची विनंती करणे.

सल्लागार मंडळ

      न्या. नरेंद्र चपळगावकर
      श्री. रंगनाथ पठारे
      श्री. वसंत आबाजी डहाके
      प्रा. प्रभा गणोरकर
      डॉ. रमेश वरखेडे
      श्री. दिनकर गांगल

संयोजन समिती

      श्री. दत्ता बाळ सराफ
      श्री. अनिल पाझारे
      श्री. चेतन कोळी
      श्री. किरण येले
      श्री. रवींद्र झेंडे

संवादक (समकालीन लेखक)

      श्री. प्रणव सखदेव
      शर्मिला फडके
      श्री. अवधूत डोंगरे
      शिल्पा कांबळे
      श्री. बालाजी सुतार
      श्री. किरण गुरव
      श्री. ह्रषिकेश गुप्ते
      श्री. बालाजी मदन इंगळे