Nilesh Nimkar

Educationist | Author | Curriculum Developer | Social Innovator

Nilesh Nimkar is an educationist, author and social innovator with over two decades of experience in early childhood education, elementary education, teacher education and curriculum development. He is the Founder Director and CEO of Quality Education Support Trust (QUEST), an organisation working to improve the quality and equity of education, particularly for children from rural, tribal and underserved communities. 

Beginning his journey as a teacher in a rural residential school serving tribal communities in Maharashtra, Nimkar developed a deep understanding of the importance of local context, language and culture in education. His work focuses on developing innovative, child-centred and context-responsive approaches to teaching and learning.

Through QUEST, he has worked extensively on teacher capacity building, curriculum development, literacy and multilingual education. His work has reached thousands of educators and children across rural and tribal communities. He is also an author whose book Shikata Shikavita brings together his experiences and reflections on education, particularly in rural and tribal Maharashtra. 

His contribution to education and social development has been recognised through several honours, including the Maharashtra Foundation Award and the Extraordinary Early Childhood Education Leadership Award. 

निलेश निमकर

शिक्षणतज्ज्ञ | लेखक | अभ्यासक्रम विकासक | सामाजिक नवोन्मेषक

निलेश निमकर हे शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि सामाजिक नवोन्मेषक असून बालशिक्षण, प्राथमिक शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम विकास या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. ते Quality Education Support Trust (QUEST) या संस्थेचे संस्थापक-संचालक असून ग्रामीण, आदिवासी आणि वंचित समुदायातील मुलांसाठी गुणवत्तापूर्ण व समताधिष्ठित शिक्षणाच्या दिशेने सातत्याने काम करीत आहेत. 

महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. या अनुभवातून मुलांची स्थानिक भाषा, संस्कृती, सामाजिक संदर्भ आणि प्रत्यक्ष जीवनानुभव यांना शिक्षणप्रक्रियेत महत्त्व देण्याची दृष्टी विकसित झाली. पुढे याच भूमिकेतून त्यांनी शिक्षणातील प्रयोगशीलता, बालकेंद्रित अध्यापन आणि संदर्भाधिष्ठित शिक्षणपद्धती यावर काम केले.

QUESTच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्यनिर्मिती, अभ्यासक्रम विकास, साक्षरता आणि बहुभाषिक शिक्षण या क्षेत्रांत विविध उपक्रम राबविले आहेत. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. 

‘शिकता शिकविता’ या पुस्तकातून त्यांनी शिक्षणक्षेत्रातील अनुभव, निरीक्षणे आणि शिक्षणविषयक भूमिका मांडल्या आहेत. ग्रामीण व आदिवासी मुलांच्या शिक्षणाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या या पुस्तकाची २०२३ मध्ये डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शिक्षणविषयक पुस्तक पुरस्कारासाठी निवड झाली होती. 

शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता आणि गुणवत्तापूर्ण संधी निर्माण करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना Maharashtra Foundation Award तसेच Extraordinary Early Childhood Education Leadership Award यांसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.